दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्र स्त्री शक्तीच्या पूर्णविरामाशिवाय अपूर्ण आहे याची अनेक दाखले देता येतील त्यापैकी वर्धा जि.प.माजी अध्यक्ष सरिताताई गाखरे यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व आपसूकच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अभ्यासकांना सरिताताई गाखरे एक आगळ वेगळ रसायन ठरल्या आहेत अफाट आणि अच्याट बुद्धिमत्तेच्या जोरावर भल्या भल्यांना सरिताताईच्या भाषणाची वैचारिक मांडणी करताना बौद्धिक कसरत लागते अश्या सरिताताई गाखरे यांचा आज वाढदिवस त्यांच्या हितचिंतकासाठी एक आनंद पर्वणी ठरते आहे पहिल्याच निवडणुकीत थेट जि.प.अध्यक्षस्थानी विराजमान होणे हा एक दुर्मिळ राजयोग मानल्या जातो तसे पाहता त्यांच्या वडिलोपार्जित रक्तातच राजकीय वारसा आहे त्यात सोने पे सुहागा म्हणजे पती विजयराव गाखरे या जीवनसाथीच्या प्रेरणेने त्यांच्या राजकीय सुप्त गुणांना एक मैदानच मिळाले आणि त्या राजकीय मैदानावर अव्वल एक महिला राजपटू ठरल्या आहेत वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील कन्नमवार ग्राम या जि.प. क्षेत्रातून विजयश्री नोंदविताना सर्वाधिक मते घेऊन जिल्हा पातळीवर सर्व पक्षीय तज्ञांच्या अभ्यासाचा विषय बनल्या निवडणुकीतच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वातील वर्धा जिल्हा परिषदेतील ८०६ दिवसाचा कार्यकाळ राजकीय अभ्यासकांना नोंद घेणारा इतिहास ठरला कोरोना संकट वर्ष २०१९-२०- २१ या वर्षातील महामारीत कुटुंबापेक्षाही नागरिकांची सेवा अग्रस्थानी ठेवत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अवेळी भेटी देऊन आरोग्य यंत्रणेस धडकी भरवत घेतलेल्या भेटी आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत गरीब रुग्णांना स्वखर्चाने सेवाग्राम, वर्धा, सावंगी (मेघे) या ठिकाणच्या वैद्यकीय उपचारासाठी सढळ हाताने वेळोवेळी केलेली मदत जिल्ह्यातील गर्भ श्रीमंतांना लाजवणारी आहे तरुणाला असलेली व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनावर ओढलेले ताशेरे सरिताताईची सामाजिक कार्याची असलेली तळमळ दर्शविते नागरिकांच्या आरोग्य सुख सुविधा साठी स्वपक्षाला घरचा आहेर देत तत्कालीन काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री ना.सुनील केदार यांना निमंत्रित करून नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे केलेले लोकार्पण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला होता अत्यंत संवेदनशील अशा आरोग्य विभागातील पदभरती करता त्यांचे भरपावसातील एक दिवसीय लाक्षणिक उपोषण राज्यस्तरीय चर्चेचा विषय ठरले याच कारणे राज्य शासनाने दखल घेऊन पदभरतीचे आश्वासन देत काही प्रमाणात आरोग्य विभागात तात्काळ पद भरती केली राज्यस्तरावरील जिल्हा परिषद पंचायत समिती असोशियन तर्फे तत्कालीन संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्तुत्ववान अध्यक्षपदाचा बहुमान त्यांच्या खात्यावर जमा आहे जि.प.अध्यक्ष पदावरून पदमुक्त होताच सरपंच संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक म्हणून पुणे एम.आय.टी.कार्यात स्वतःला झोकून देत आजही कार्यरत आहे सोबतच जि.प.व पं.स.असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्ष, भोयर पवार समाज संघटन मंत्री तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथील श्री.अनुसया माता नवदुर्गा जागृत देवस्थान च्या कोषाध्यक्ष पदाचे कार्य यशस्वीपणे सांभाळत आहे अश्या विविध अंगी कार्यात कुशल असणाऱ्या सरिताताईंना अनेक विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सरिताताईची धार्मिक बाजू पाहता आजही दिवसाची सुरुवात पूजा केल्याशिवाय सुरू होत नाही तेवढ्याच त्या धार्मिक वृत्तीच्या आहे याबतीत पती विजयराव यांची वेळप्रसंगी धुसपुस सहन करावी लागते मात्र देवपूजा केल्याने मन प्रसन्न होऊन आपल्या हाताने सत्कर्म घडत असल्याचे सरिताताई ठामपणे पती विजयरावांना बजावतात अशा विविध पैलूंना मोजत सर्वसामान्य नागरिक सरिताताई मध्ये उच्च दर्जाचं राजकीय नेतृत्व शोधत आहे पण व्यक्तिमत्त्वात गुणवत्ता न शोधणारे राजकारणी त्यांना या पदावर जाऊ देतील काय? याचे उत्तर मात्र नकारार्थी आहे माहेर आणि सासर यांचा राजकीय वारसा असलेल्या सरिताताईची अल्पावधीत वाढलेली राजकीय लोकप्रियता कार्यकर्तृत्व, निर्णयक्षमता, अफाट बुद्धिमत्तेच्या धनी असलेल्या भोयर पवार समाजातील नेत्या म्हणून उदयास आहे अश्या युवा महिला नेतृत्वास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
