दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकीसाठी अखेर च्या दिवशी सर्वच पक्षाच्या ईच्छूक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यात सर्वच पक्षांना निवडणुकीत उत्सूकता असल्याचे स्पष्ट होत आहे परंतु अर्ज छाननी नंतर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे स्पष्ट होईल सध्यातरी भा.ज.पा.,काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ( शिंदे गट आणि ठाकरे गट) आणि बि.आर.एस. या प्रमुख पक्षांसह अन्य अर्ज दाखल करण्यात करण्यात आले आहेत.
सध्या राज्यात बाजार समितीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून त्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील महत्वाची समजली जाणारी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर ही राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदार संघातील असल्याने त्यास वेगळे महत्व असून नामनिर्दशनपत्र भरण्याच्या शेवट च्या दिवस अखेर पर्यंत एकूण १९४ अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून एकूण १२१ अर्ज दाखल केले गेले असून ह्यापैकी सर्वसाधारण ८४, महिला १५, ई.मा.व. ११, वि.जा.भ.ज. ११, ग्राम पंचायत मतदार संघातून ४९ अर्ज दाखल यापैकी सर्वसाधरण २५, अ. जा. / अ. ज. १३, आ.दृ. दूर्बल घटक ११, आणि आडत व व्यापारी गटातून १४ तर हमाल व मापाडी मधून १० याप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गणलेवार यांनी दिली आहे
दाखल झालेल्या अर्जाची छाननी ही दि. ०५ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर दि.०६ एप्रिल रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर दाखल केलेले अर्ज माघार घेण्याकरिता ०६ एप्रिल ते २० एप्रिल हा कालावधी असून, दि. २१ एप्रिल रोजी उमेदवारास चिन्ह वाटप करण्यात येणार आहे, दि. २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे आणि दि. २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीमध्ये वरील पक्षाच्या उमेदवारांत चुरशीची लढत होईल असे बोलल्या जात असून पुन्हा एकदा सदरील बाजार समिती वर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचेच वर्चस्व राहील का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
