दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
मंठा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहिर झाली असून उमेदवारी दाखल करण्याच्या अंतीम दिवसा अखेर १८ जागांसाठी 177उमेदवारी अर्ज दाखल केलेत. (दि . ३) रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यावतीने उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, गोपाळराव बोराडे, कपिल आकात, अंकुशराव अवचार, भाऊसाहेब गोरे, पंकज बोराडे, किसनराव मोरे, अण्णासाहेब खंदारे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी करण्यात आली आहे. मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीची १८ संचालक पदाच्या जागेसाठी ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापाडी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सोमवारी एकाचवेळी अर्ज दाखल केल्यामुळे उमेदवारांसह त्यांचे समर्थकांनी देखील मार्केट आवारात तोबा गर्दी केली होती. अर्ज दाखल करताना माजी सभापती संतोष वरकड, तालुकाप्रमुख अजय अवचार, श्रीरंगराव खरात, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड, बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव खरात, पंचायत समिती सदस्य बाबाराव राठोड, मधुकर काकडे, वसंतराव काकडे, केशव महाराज सरकटे, कैलास सरकटे,माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप बोराडे, बालासाहेब बोराडे, नितीन राठोड, अचितराव बोराडे, तुळशीराम कोहिरे, जे. के. कुरेशी, डॉ. डी. जी. काकडे, रंजीत दांगट, विकास सूर्यवंशी, अरुण वाघमारे, प्रताप जाधव, सचिन साबू, मुनाफ कुरेशी, रवी खनपटे, गोपाळराव सरकटे, पप्पू दायमा, शरद मोरे, योगेश नाईक विष्णू चव्हाण उपस्थित होते. ५ एप्रिल दुपारी १२ वाजता छाननी, ६ ते २० रोजी दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांना चिन्हेवाटप करून अंतीम यादी जाहिर केली जाणार आहे ३०एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान घेतले जाणार आहे. सेवा सहकारी संस्थेच्या मतदार संघात सर्वसाधारण जागेसाठी 54, महिला राखीव 23, इतर मागासवर्ग 9, अनुसूचित जमाती 15 ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण जागेसाठी 26 अनुसूचित जाती-जमाती 13 आर्थिक दुर्बल घटक 13, व्यापारी व आडते मतदार संघात 13, हमाल व मापारी मतदार संघात 11 असे एकूण 177 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
