दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:
आय.पि.एल सुरू होताच देगलूर शहरात व तालुक्यात खुले आम आय.पि.एल सट्टा चालत असुन या मध्ये १८ ते २० वयो गटातील युवकांन सह इतर नागरीकांचा मोठा सहभाग असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून कोरोनामुळे आधीच नागरिक हातबल झाले असून व बेरोजगारी वाढल्यामुळे नागरिकांच्या हाताला काम मिळत नसल्याने जास्तीत जास्त लवकर पैसा कसा कमवावा यासाठी अनेक जण विविध पर्याय शोधत असून त्यातलाच एक पर्याय म्हणून कोरोना नंतर पहिले आयपीएल सुरू झाली असून जो युवक पुन्हा आपला एकदा व्यवसाय सुरू केला होता मात्र पुन्हा आता आयपीएल सट्टा सुरू झाल्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. सट्टा खेळण्यासाठी पैसे नसल्यास इतर मार्गांनी पैसे मिळून सट्टा खेळत आहेत यामुळे गुन्हेगारी देगलूर व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे
या आय.पि.एल सट्टे बाज बहादारावर स्थानिक प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
