दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी: आर्वी विधानसभेतील भाजपाचे युवा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्विय सहाय्यक सुमित वानखेडे हे ग्रामीण पांदन रस्ते व नदी नाले खोलीकरण शिवार फेरी व शेतकरी संवाद रॅलीत धाडी येथे आले असता दै.चालू वार्ता प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरा दाखल कबुली दिली याबाबत असे की,आर्वी विधानसभेचे भाजपा आ.दादाराव केचे आणि भाजपाचे युवा नेते आर्वी विधानसभा क्षेत्रात विविध बॅनरखाली वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे त्यानिमित्ताने भाजपा पक्षासह विरोधी पक्षात येत्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आ. दादाराव केचे की भाजपा नेते सुमित वानखडे यांच्या उमेदवारी बाबत खलबते सुरू असून भाजपा कार्यकर्त्यात संभ्रमावस्था ऐकायला मिळते आहे त्यानिमित्ताने दै.चालू वार्ता प्रतिनिधींनी सुमित दादांना येत्या विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी आहे का असा थेट प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना सुमित वानखेडे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याच्या जटिल समस्या व नदी,नाले खोलीकरण याबाबत शिवार फेरी असून राजकारणाचा या विषयाशी काही संबंध नाही शिवाय माझी विधानसभेसाठी उमेदवारी नाही शेतकऱ्याच्या जटील समस्येचे निराकरण करणे माझ्यासाठी एक मोठे सामाजिक कार्य असल्याचे स्पष्ट केले तर तळेगाव(शा.पंत) येथील वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात प्रश्न विचारला असता भाजपा पदाधिकारी सचिन होले यांनी मध्येच हस्तक्षेप करत प्रश्नाला बगल दिली त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरी संदर्भात माहिती मिळू शकली नाही हे विशेष सुमित वानखेडेच्या आगमनापूर्वी धाडी येथील एका वरिष्ठ कार्यकर्त्यांनी जाम नदीच्या पुलावर मी भाजपा आ.दादाराव केचे व काँग्रेसचे माजी आ.अमर काळे यांचा कार्यकर्ता नसून मी फक्त सुमितदादा वानखेडे यांचा कार्यकर्ता म्हणून हजर असल्याची चर्चा धाडी गावात चर्चेचा विषय झाला आहे सुमित वानखेडे यांच्या शिवार फेरी व शेतकरी संवाद रॅलीत भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर, भाजपा पदाधिकारी सचिन होले,चर्मद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक विजयकर यांच्यासह गावातील भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यात विष्णू चोरे, विनोद ढोंगे, वैभव गेडाम, मोहन दंडाळे,हरीभाऊ गेडाम, विलास कडू, ईश्वर गाडगे, ज्ञानेश्वर पापडकर, महादेव फूसे,रामा धूर्वे सहभागी होते
