दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेले 80 किलोमीटर अंतरावर असलेले दिग्रस बु.हे गाव.. या गावी सोपानराव माधवराव यानभुरे या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अर्थातच अवलियाच्या उदरी जन्मास आलेल्या तीन मुलांपैकी द्वितीय रत्न सतीश सोपानराव यानभुरे हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक असून ते लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष , हुशार , बुद्धिमान , ज्ञानपीपासून , एकनिष्ठ , कर्तव्यनिष्ठ व अभ्यासात सर्वश्रेष्ठ असे त्यांचे व्यक्तिमत्व… विविध गुणांनी नटलेल्या सतीश यानभुरे यांना शिक्षिकेचा पेशा अतिशय प्रामाणिक पणे पार पाडत असताना साहित्य क्षेत्रात खूप मोठी आवड निर्माण झाली आणि त्या साहित्य निर्मितीमध्ये कथा , कविता , कादंबरी अशा विविध बाबींवर मोठ्या प्रमाणात त्यानी लिखाण करण्यास सुरुवात केली. .सतीश सोपानराव यानभुरे यांचा पहिला कथासंग्रह ” धूळधाण ” दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी मोठ्या उत्साहात प्रकाशित होणार आहे या प्रकाशन सोहळ्यासाठी साहित्य क्षेत्रातील तमाम मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व जवळचे अप्तस्वकीय व मित्रपरिवार यांना सोशीएल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे हा प्रकाशन सोहळा संयोग मंगल कार्यालय टोल नाक्या शेजारी चांडोली तालुका खेड जिल्हा पुणे येथे 25 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ तालुका खेड जिल्हा पुणे यांनी केले असून पुस्तकाचे प्रकाशक बुक क्लिनिक प्रकाशन छत्रपती संभाजी नगर छत्तीसगड यांनी केले असून धूळधाण या कथासंग्रहाचे लेखक नांदेड जिल्ह्यातील एका शेतक-याच्या मुलांनी केले आहेत त्यांच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील जगद्विख्यात साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांनी शुभेच्छा सुद्धा दिले आहेत . . लेखक सतीश सोपानराव यानभुरे यांचे यांच्या कथासंग्रहात , ” वाड्यातली गुढ , वावटळ , अडाणी धोंडाई , सदाशिव , एक अपघात , माणूस पण , देव माणूस , कर्जात बुडाला संसार , रमा , शहीद , शादुल मामा , चटकीण आणि विंचू , संकट , रेल्वेचा प्रवास , गाडी चुकली , सौंदर्यपुराण , संकटातील सोबती , अंड्याचा बेत फसला , आजीने दिला सुखद धोका , अंधारातील घुसमट , अवलिया , कोडबा , डाव ,वंदना ” या सर्वच भन्नाट कथा वाचकास वाचण्यासाठी मिळणार आहेत या सर्व कथा अंगावर शहारे आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहणार नाहीत असे मत लेखक पुणे जिल्हा परिषद शिक्षक सतीश सोपानराव यानभुरे यांचे आहे.
