दैनिक चालु वार्ता भूम प्रतिनिधि-नवनाथ यादव
भूम:-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये (जिल्हा – उस्मानाबाद) साठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्षवाढीच्या उददेशाने जबाबदारी देण्यात निश्चित करण्यात आली.सदरील पदाचा उपयोग करुन आपण पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबध्द राहावे असे आदेशात म्हटले आहे.पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देण्यात आल्या.जिल्हा कार्यकारिणीची संरचना खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली.
शितल दादाराव चव्हाण जिल्हाध्यक्ष ,धीरज शिंदे महासचिव ,वैभव गायकवाड उपाध्यक्ष, आशिष लोंढे उपाध्यक्ष ,काशिनाथ वाघमारे संघटक,उमेश चंदनशिवे संघटक ,विशाल वाघमारे सचिव ,अशितोष कांबळे सहसचिव ,कृष्णा शिंगारे प्रसिद्ध प्रमुख,गोविंद भंडारे प्रवक्ता ,फिरोज तांबोळी सदस्य,शरदचंद्र सोनवणे सदस्य, जगदीश राठोड आदी निवड करण्यात आली.
