दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड – विश्वरत्न,राष्ट्रनिर्माते,प्रज्ञासुर्य, बोधिसत्व,भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती,मुखेड च्या वतीने शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी मुखेड शहरातील जि.प.हा.(मुलींची) शाळा मैदान येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेस्टार गायक भिमगीरीचा बुलंद आवाज साजन बेंद्रे व विशाल चव्हाण आणि त्यांचा संच यांच्या भिमगितांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचे आयोजक अनिल सिरसे (रि.प.सेना मराठवाडा निरीक्षक),यांच्या संकल्पनेतून तर अध्यक्ष संदीप बावलगावकर,कार्यक्रमाचे संयोजक मोहनदादा गायकवाड,पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर,अतिराज कांबळे,आशिष भारदे, सिद्धार्थ कांबळे बेळीकर (युवा व्याख्याता),मिलींद लोहबंदे,आदींच्या संयोजनातून व सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमा च्या सुरुवातीस जगाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यसम्राट आमदार डॉ.तुषारजी राठोड,उद्घाटक – सुरेशदादा गायकवाड (आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार),स्वागताध्यक्ष – गांगाधरजी राठोड (माजी नगराध्यक्ष,मुखेड), प्रमुख मार्गदर्शक- व्यंकटराव लोहबंदे (भाजप नेते),गौतम काळे (रि.पा.ई.जिल्हाध्यक्ष), उत्तम बनसोडे (माजी नगरसेवक,मुखेड),विशेष निमंत्रीत सुभाष साबणे (माजी आमदार),किरण घोंगडे (युवा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष रि.प.सेना),खुशाल पाटिल उमरदरीकर, नारायणराव गायकवाड (स्व.लि.आ.डी.फार्मसी कॉलेज,मुखेड),लक्ष्मण पाटील खैरकेकर,संदीप मांजरमकर (जिल्हाध्यक्ष रि.प.सेना नांदेड),राजु घोडके, इत्यादींच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुखेड तालुक्यासह संपुर्ण नांदेड जिल्हाभरातून जनसमुदायांनी तुफान गर्दी करीत कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमा वेळी कार्यक्रमाचे आयोजक अनिल सिरसे व संयोजन समिती च्या वतीने उपस्थीत मान्यवरांचा व तालुक्यातील अनेक सरपंचाचा स्मृतिचिन्ह,पुष्पहार,शाल देवून सन्मानीत करण्यात आले.सिनेस्टार गायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांनी आपल्या सुमधुर आवाजातील चांद भी शेरमाए, जब बाबा मुस्कुराये, क्या बताऊ उनकी मैं कहाणी मेरे भीम की हैं दुनिया दिवानी, कुणी हल्ला करेल,कुणी कल्ला करेल, याची नाही मला खंत, भीमराव जिंदाबाद म्हणेल मी जो वर आहे जीवंत, ही जय भीम वाली पोर कशी भीमाच्या वाटेने चालली अशी एकापेक्षा एक भीम गीतांनी उपस्थीत जनसमुदायास मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला राजकुमार सुर्यवंशी (रि.प.सेना जिल्हाध्यक्ष परभणी),प्रशांत गोडबोले (रि.प.सेना युवाजिल्हाध्यक्ष),अंकुश सावते (विद्यार्थी जिल्हाध्यक्ष) रवींद्र सोनकांबळे (रि.प.सेना जिल्हा महासचिव) भीमराव बुक्तरे,प्रभाकर इंगळे तांदळी निवृत्ती कांबळे सांगवीकर, उत्तम बनसोडे (माजी नगरसेवक), राजु बामणे, अशोक गजलवाड,किशोर चौहान इत्यादींसह महिला भगिनी व पुरुष बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतील मोहन गायकवाड,पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर,अतिराज कांबळे, संदीप कांबळे बावलगावकर, सिद्धार्थ कांबळे बेळीकर,मिलिंद लोहबंदे,आशिष भारदे, पप्पू सोनकांबळे इत्यादींनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
