दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- महात्मा ज्योतिराव फुले तसेच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसाकम च्या वतीने रविवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
नांदेड येथील नमस्कार चौकस्थित हॉटेल गणराज येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व कार्यकारी अभियंता सुग्रिव अंधारे हे रहाणार असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध दंगलकार नितीन चंदनशिवे, पूर्व सनदी अधिकारी अनिल मोरे यांचे व्याख्यान संपन्न होईल.या कार्यक्रमास आ.जितेश अंतापूरकर माजी आ. अविनाश घाटे, ॲड. सुरेंद्र घोडजकर, उमेश पवळे, आनंद गुंडले,मारोती वाडेकर,पूर्वसनदी अधिकारी व्ही.जे.वरवंटकर, डॉ.डी. एन.नेटके,महासचिव गुणवंत काळे,राष्ट्रपत्ती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, प्रवक्ते चंद्रकांत मेकाले, मराठवाडा अध्यक्ष अण्णासाहेब तोडे, उपाध्यक्ष शिवाजी टोम्पे, मल्हराराव तोटरे, अशोक झुंजारे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन
जिल्हाध्यक्ष विजय रणखांब,सचिव पी.एम.सूर्यवंशी कार्याध्यक्ष लक्षमण वाघमारे, कोषाध्यक्ष बालाजी गुंडले, मारोती घोडजकर,चंद्रकांत भांडवले,शिवाजी मोरे,डी.आर. गायकवाड,प्रा.डॉ.एन.के. वाघमारे,बालाजी गवाले, एम.एम. बसवंते आदीनी केले आहे.
