दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थी प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मेघराज पाटील क्षीरसागर यांच्या हस्ते फीत कापून या कार्यक्रमाचे सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या शाळेतील प्रथम पावलांचे ठसे घेऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे सहशिक्षक श्री गोणारे सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यी विद्यार्थ्यांचे आई वडील यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता याप्रसंगी गावातील बळी पाटील क्षीरसागर, तुकाराम पाटील क्षीरसागर, गोविंद मामा नरवडे अंगणवाडी सेविका, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर ,श्री पुरी सर, श्री कदम सर श्री श्री गिजे सर ,श्री मंगनाळे सर आदी उपस्थित होते आभार श्री कोंडे सर यांनी मांडले
