दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, लोहा द्वारा संचालीत डॉ. याकुबखॉंन उर्दू प्राथमिक शाळा, लोह्याच्या आदर्श शिक्षिका सौ. साहेरा बेगम मोईनुद्दीन यांनी 37 वर्षाची प्रदीर्घ सेवा करत 30 एप्रिल 2023 रोजी नियत वयोमानानुसार वयाचे 58 वर्ष पूर्ण करुन सेवा निवृत्त होत असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री श्रींकात वसंतराव पाटील (पवार), छत्रपती शळेचे मुख्याध्यापक श्री वडजे सर व मुख्याध्यापक श्री सुलतान खॉंन व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक,व विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. याकुबखॉंन उर्दू शाळा लोहा येथे सौ. सायरा बेगम मोईनुद्दीन ह्या 15 डिसेंबर 1986 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणुन रुजु झाल्या. सेवाकालात त्यांनी साक्षरता अभियान, भारताची जनगणना, विधानसभा लोकसभा निवडणूक अशी अनेक राष्ट्रीय कामे पार पाडली. पंचायत समिती लोहा च्या वतीने त्यांना 1996 साली आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
30 एप्रील, 20२३ योजी आदर्श शिक्षिका म्हणून सेवानिवृत होत असल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीकांत वसंतराव पाटील(पवार), छत्रपती शाळेचे मुख्याध्यापक श्री वडजे सर, मुख्याध्यापक सुलतान खॉंन शाळेतील शिक्षिका, निखत बाजी, फहीम बाजी, मसरतजहाँ बाजी, सुरेय्या बाजी, कळसकर मावशी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विदयार्थ्यांनी आदर्श शिक्षिका सौ. सहेरा बेगम यांचा सत्कार करून व भेट वस्तु देवून सन्मान केला. डॉ. याकुबखान उर्दू शाळेतील सहशिक्षिका साहेरा बेगम मैनोदीन सेवानिवृत्त ; निरोप समारंभ
कार्यक्रमाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे केले वाटप करण्यात यावी असे हि ते म्हणाले
लोहा शहरातील डॉ.याकुबखान उर्दू शाळेतील सहशिक्षिका साहेरा बेगम मैनोदीन आज दि.३० एप्रिल २०२३ रोजी निसर्गाच्या नियमानुसार सेवानिवृत्त झाल्या त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती समारोह कार्यक्रमांचा अवाढव्य खर्च न करता तो खर्च त्यांनी शाळेतील गोरगरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन एक आदर्श निर्माण केला.
मुस्लिम समाजातील आदर्श शिक्षिका म्हणून त्यांची शहरांमध्ये ओळख होती पहिल्या उर्दू शिक्षिका म्हणूनही त्यांनी मान मिळवला आहे त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभले आहे. शेख सायरा बेगम हे एसटी महामंडळातील माजी अधिकारी शेख खलील यांच्या पत्नी व पत्रकार युनूस शेख यांच्या त्या काकू आहेत.
