दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामा जाही केला आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून काँग्रेसने मतदारांना निवडणुकीत अनेक आश्वासने दिली आहेत. यावेळी खर्गे यांनी काँग्रेस पक्ष कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू केली जाईल, असेही खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन : कर्नाटक राज्यात सरकार स्थापन झाल्यास सर्व रिक्त शासकीय पदे भरण्याचे आश्वासन मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले. 2006 नंतर नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजनेंतर्गत (OPS) पेन्शन दिली जाईल असेही त्यांनी यावळी स्पष्ट केले. जाहीरनामा जारी करताना रणदीप सिंह सुरजेवाला, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या, बीके हरिप्रसाद आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष जी परमेश्वर शांग्रीला उपस्थित होते.
