दैनिक चालु वार्ता, मंठा प्रतिनिधी
(प्रविण कुलकर्णी)
मंठा तालुक्यातील उमरखेड या गावातील प्रमोद कुलकर्णी यांच्या घरी कोब्रा जातीचा विषारी नाग आढळुन आला ही माहिती प्रदीप कुलकर्णी यांनी वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र बाळु चाळक व सहकारी शुभम उबाळे यांना दिली. काही वेळात सर्पमित्र बाळु चाळक व त्यांचे सहकारी मित्र शुभम उबाळे हे उमरखेड येथे येऊन ११:३० च्या सुमारास कोब्रा जातीच्या विषारी नागाला पकडुन मनुष्य वस्ती पासुन दुर व सुरक्षित ठिकाणी जंगलात नेऊन सोडुन दिले व सर्पमित्र बाळु चाळक हे मंठा तालुक्यात अनेक वर्षा पासुन साप पकडुन त्यांना सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडतात सर्पमित्र बाळु चाळक यांनी पाच हजार पेक्षा जास्त साप पकडुन सापाला जंगलात सोडुन सापाला जीवनदान दिले आहे .तसेच साप दिसल्यास सापाला न मारता सर्पमित्राला संपर्क करून कळवावे असे बाळु चाळक यांनी सांगितले तसेच उमरखेड येथिल कुलकर्णी कुटुंबांनी बाळु चाळक यांचे कौतुक केले.
