सा.गेवराई संवाद…
कृष्णा जाधव
गेवराई उमापूर उमापूर मधील प्रत्येक समाज बांधव हा आज चिडून उठला आहे.या गावाला 20-25 वर्षापासून पाणी पिण्यासाठी नाही
रस्ते,नाल्याावरती ,गटारी, संडास बाथरूम, मुतारी, तशाच उघड्या पाण्याच्या मोर्या जिल्हा परिषद शाळा भोतालीची घाण, समोरची उघड्यावरची मुतारी त्याच उघड्यात्याच उघड्यावरच्या मुतारीचे पाणी नाल्याने मारीतूच्या मंदिरानाल्याने मारोतीच्या मंदिरासमोर जाते.व तेथेच साठवून राहते नाली तर नाहीच त्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वास दुर्गंधी पसरते तेथे कोणताही सेंट फेल होईल
रस्त्याची अशी बिकट अवस्था या गावात झाली असून, ग्रामसेवक ग्रामपंचायत याचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असून नागरिकांतून यामुळे खंत व्यक्त होते.हेच नाही तर या गावात 15 ते 20 खेड्याचे लोक ये जा करतात.कारण उमापूर हे व्यापाऱ्यांसाठी मोठे केंद्र बनले असून
ही सर्कलची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.या पेठेत अनेक धान्य,कडधान्य ,कापूस ,सोयाबीन, असे अनेक शेतीचे माल विकण्यासाठी शेतकरी वर्ग ये जा करत असतो.त्यांच्यासाठी येथे धडाचा रस्ताही नाही मग एवढ्या मोठ्या सर्कलच्या गावाला विकास नकोय का?
मग उमापूर ग्रामपंचायत घरपट्टी,
नळपट्टी व इतर कर वसुली केले जाते
मग उमापूर मध्ये विकास काम का नाही अशा प्रश्न जनसामान्यांकडून उपस्थित होतो.नागरिकांना नाट त्रास देण्याचा ठेका ग्रामपंचायत ने धरलेला आहे का?असे अनेक तक्रारी नागरिकांतअसे अनेक तक्रारी नागरिकांतून होत असल्याचा प्रकार उमापूर मधून घडून येत असून, यावर लवकर निर्णय घेऊन काम करा असे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
एवढ्या मोठ्या सर्कलच्या उमापूर या गावात एसटी वळण्यासाठी जागा देखील नाही.
मग ग्रामपंचायत करते काय?
प्रवाशांना चिखल तुडवत गावातून उमापूर फाट्यावर यावे लागते
गावातून फाट्यावर घेण्यासाठी चक्कर रस्ता सुद्धा धडाचा नसल्याने नागरिक खूप त्रस्त झाले आहे.
कारण वाढत्या अतिक्रमणाने गावाला बुजून टाकले असून, यावर लक्ष देण्याची गरज वाटत नाही का?
आपल्या मनमानी कारभाराने गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे सदर ग्रामपंचायत ने केला असून, आमदार कार्यसम्राट लक्ष्मणांना पवार यांनी याबाबतीत स्वतः येऊन पाहणी करून योग्य निर्णय घ्यावे असे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
कारण उमापूर हे गाव लक्ष्मण आण्णा पवार यांचे दत्तक घेतलेले गाव असून, पुढार्यांची या गावावर पूर्णतः दुर्लक्ष असून आमदारांनीच योग्य कार्यवाही करावी अशी गावकऱ्यांतून हळहळ व्यक्त होते.
उमापूरचा विकास त्यांनी स्वतःहून येऊनन पहावे,
अशी गावकऱ्यांकडून आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्याकडे मागणी होत आहे.
