दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी गजानन जाधव
कंधार (पेठवडज) :- याबाबतचे सविस्तर वृत असे की गावच्या परंपरेप्रमाणे गावातील ग्रा. प. व सर्व ठिकाणचे झेंडावंदन
हे जी.प.हा.चे स्काऊट पथक आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रगीत म्हणून होत असते.काही दिवसांपूर्वी जी.प. हायस्कूलमध्ये नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीची निवड ही कायदेशीर रित्या सर्व पालकांच्या सहमतीने बिनविरोधपणे करण्यात आली.
पण समिती निवडीच्या वेळी मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायत ची हस्तक्षेप /मर्जी न राखता समितीची निवड ही अत्यंत पारदर्शकपणे नियमानुसार बिनविरोध केली.समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील नसल्यामुळे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक सुडबुद्धीने समिती बरखास्त ची मागणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्याकडे केली होती .शिक्षण विभागाने चौकशी करून समिती कायदेशीर बिनविरोध असल्याचा अहवाल शिक्षण अधिकारी यांना दिला.
समिती कायदेशीर रित्या कायम राहिली.तरी पण ग्रामपंचायतच्या मनातून सूड भावना जात नव्हती.
शेवटी सुडभावनेतून ग्रामपंचायत ने झेंडावंदनाचा कार्यक्रम हा जिल्हा परिषद हायस्कूल स्काऊट पथक येण्याच्या पूर्वीच खाजगी संस्थेच्या विद्यार्थ्यांना बोलावून उरकून घेतला. आणि
मा.सरपंचाने जि.प.हायस्कूलच्या आमंत्रणाला स्काऊट पथकाची मानवंदना घेण्यासाठी उपस्थित पण राहिले नाही.राजकीय सुडाचा राग ग्रामपंचायत शाळेवर काढत असल्याची शाळेत राजकारण करत असल्याची चर्चा सर्व पेठवडज ग्रामस्थातून आहे.१५ आॅगस्ट हा राष्ट्रीय उत्सव असून शासकीय यंत्रणेचा अपमान केला आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे असे जनतेतून बोलल्या जात आहे.
