दै.चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर):आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय मालेगाव येथे सरपंच संघटनेचे अध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेमध्ये विविध वकृत्व स्पर्धा घेण्यात आले त्या स्पर्धेमधील भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिवराज पाटील माळेगावकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून विद्यार्थ्यांना शिवराज पाटलांनी पुढील शैक्षणिक कार्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शाळेच्या परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभात फेरीमध्ये उत्साहाने भाग घेतला त्यावेळी सरपंच संघटनेचे देगलूर तालुका अध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व गावातील अनेक पालक या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाला उपस्थित होते…
