गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा :- महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी, सारथी नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी हरसद तालुका लोहा, येथे प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पीएचडी स्कॉलरशिप एमपीएससी युपीएससी क्षेत्रात काम करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी, या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे.
यावर्षी या संस्थेने प्रथमच संगणक क्षेत्रात पाऊल टाकले आहे MKCL आणि SARTHI यांच्या संयुक्त विद्यमाने ही संस्था 30 हजार रुपयांचा CSMS – DEEP डिप्लोमा कोर्स अगदी मोफत देत आहे. याची माहिती गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी, 15 ऑगस्ट चे औचित्य साधून हरसद येथील ग्रामस्थांना, विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांना सारथी योजनेच्या विविध योजनांची, जसे की परदेशी भाषा प्रशिक्षण दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती, कृषी विभागातील विविध योजना, उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सध्या नव्याने 75 विद्यार्थींना परदेशी शिक्षण घेण्यासाठी सारथी पुढे कार्य करत आहे.
याच सगळ्या उपक्रमांची माहिती OMSAI Infotech LOHA …ची विद्यार्थिनी, कु. स्वाती सुधाकर कोल्हे हीने गावातील विद्यार्थी ग्रामस्थ यांना दिली, यावेळी उपस्थित गावाच्या सरपंच सौ. पार्वती शिवाजी जामकर उपसरपंच सौ. वंदना संजय भालेराव ग्रामसेवक, इब्राहिम सय्यद, शाळेचे मुख्याध्यापक, ठाकुर सर, संजय भालेराव, सटवा जामकर, राजेश कोल्हे, पुंडलिक लाडाणे सोपान ठाणेकर, दामाजी ठाणेकर, भिमराव भालेराव यांच्या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
