स्वातंत्र्यदिनानिमित्त मुखेड शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन…
दै.चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिरादार
नांदेड/मुखेड तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 वा वर्धापन दिन विविध उपक्रमाने अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाच्या वतीने आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित तिरंगा रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. तहसील प्रशासनाने ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकाचा सन्मान केला तिरंगी ध्वज देशभक्तीपर गीत घोषणांनी वातावरण भारले होते.
शासकीय मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसील कार्यालयात तहसीलदार राजेश जाधव,पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी सी.एल रामोड, यांच्या हस्ते आणि नगर परिषद कार्यालयातील प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार पाटे,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तहसीलदार जाधव आमदार डॉ. तुषार राठोड, डॉ. दिलीप पुंडे, नायब तहसीलदार भोसीकर, पोलीस निरीक्षक रमेश वाघ, यांच्या हस्ते शासन आपल्या दारी उपक्रमात विशेष कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात गटविकास अधिकारी सी. एल रामोड महसूल कर्मचारी संदीप भुरे, व अन्य काही जणांचा समावेश होता. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कला गुणांचा आविष्कार घडवला त्या माध्यमातून देशभक्तीपर गीते देखावा सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले.
व शहरातील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल वतीने विविध देखाव्यासह,शहरातून मुख्य मार्गाहून प्रभात फेरी काढण्यात आली होती
यात, लेझीम पथक, भारत माता, वृक्षदिंडी ग्रंथदिंडी तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देणारे विद्यार्थी मोठ्या उत्साहात प्रभात फेरीत सहभागी झाले होते. व ही प्रभात फेरी लक्षवेधी ठरली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपा आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा दुचाकी रॅली मुख्य मार्गावरून काढण्यात आली. यात भाजपा युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. भारत माता की जय, तिरंगा झेंड्याचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, आ. डॉ. राठोड, बालाजी पाटील अंबुलगेकर, डॉ. माधव पाटील उच्चेकर , डॉ. वीरभद्र हिमगिरे,लक्ष्मण पाटील खैरकेकर, खुशाल पाटील उमरदरीकर, डॉ व्यंकट सुभेदार भोसले, व्यंकटराव लोहबंदे, व्यंकटराव जाधव, किरण पाटील बोडके, अमोल मुडगुलवार, सुधीर चव्हाण, माजी नगरसेवक सह अनेक जण उपस्थित होते , माजी नगरसेवक जगदीश बियाणे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मिठाईवाटप करण्यात आली.
