दै.चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर);ग्रामपंचायत, काठेवाडी, येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम. राबविण्यात आले. माननीय सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण, शीला फलकाचे अनावरण, अमृत वाटिका उभारणे, पंचप्राण शपथ घेणे, वीरांचा सन्मान करण्यात आले. दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट विविध कार्यक्रम राबविण्यात आले. वृक्ष लागवड करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, व्यसनमुक्ती जनजागृती करणे, तंबाखू मुक्त शपथ घेणे, शेती व पशुधन विषयक माहिती देणे, हर घर तिरंगा उपक्रम अति उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी गावातील माननीय सरपंच, माननीय उपसरपंच, माननीय ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामपंचायत सचिव गावातील महिला, पुरुष व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शासकीय उपक्रम असो अथवा गावातील सार्वजनिक कार्य असो समस्त गावकरी एकजुटीने कार्य पार पाडतात असे काठेवाडी गावाची ख्याती आहे.
