दैनिक चालु वार्ता
परांडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा खासापुरी रोडलगत निरंकारी सत्संग भवन आहे या ठिकाणी दर रविवारी साप्ताहीक सत्संग भरवली जाते १५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधत संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा परंडा लोखंडवाडी यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय सत्संग सोहळा व रक्तदान शिबीर संपन्न झाले निरंकारी परिवारामध्ये १५ ऑगस्ट हा दिवस मुक्तीपर्व दिवस म्हणुन साजरा केला जातो मुक्तीपर्व दिवसाचे औच्चीत्य साधत निरंकरी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या सोहळ्याला परंडा लोखंडवाडी येथील भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते व रक्तदान शिबीराचे उद्घघाटन निरंकारी मंडळाचे सोलापुर झोनल प्रमुख इंद्रपाल नागपाल जी यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घघाटन प्रसंगी उपस्थित असणारे परंडा मुखी फुलचंद बनसोडे लोखंडवाडी मुखी भोसले , सुरेश मदने,शहापुरे , सेवादल संचालक गणेश विर युवा उद्योजक धीरज ठाकुर निरंकारी मंडळाचे सर्व सेवादल उपस्थित होते तसेच विश्वास भोसले मुंबई यांच्या उपास्थिती मध्ये अकरा ते एक या दरम्यान प्रवचनाचा कार्यक्रम झाला
या रक्तदान शिबीरामध्ये इच्छुक १३० रक्तदात्यानी रक्तदान केले निरंकारी मंडळाच्या वतीने इच्छुक रक्तदान करणाऱ्या सदस्याला मंडळाच्या वतीने गिफ्ट देऊन गौरविण्यात आले
या कार्यक्रमा मध्ये रक्तदान करणाऱ्या व सत्संग सोहळ्याला येणाऱ्या सर्व भक्तगणाला जेवणाची व चहापाण्याची सोय करण्यात आली होती
सत्संग सोहळा चालु असताना देखील रक्तदान करण्याचे काम सुरू होते निरंकारी मंडळ अनेक दिवसापासुन रक्तदान शिबीराचे आयोजन करत आहे तसेच १३ ऑगष्ट रोजी निरंकारी मंडळाच्या वतीने मॉटरसायकल रॅली व कै रावसाहेब पाटील विद्यालय निजामपुरा गल्ली परंडा येथे वृक्षारोपन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले…
