दै.चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर):देगलूर शहरात लोहिया मैदान नागोबा मंदिर जुना सराफा रामपूर रोड या ठिकाणी दुकानातील अर्धे सामान रस्त्यावरच व दुकानात खरेदीसाठी आलेल्या मोटारसायकल स्वार त्याच दुकानाच्या समोर आपले वाहण उभे करतात. तर दुकानदारही खरेदी केलेले साहित्य दुकानात उतरुन घेण्यासाठी चक्क रस्त्यावर मोठे वाहण उभे करत असल्याने. यातून गर्दीचा फायदा घेत खिसे कापू महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच सर्वसामान्यांना तर सोडाच रुग्णवाहिकेला सुध्दा अनेकवेळा वाट मिळत नाही या मुळे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी होत असताना दिसत आहे मात्र वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी दूर करताना कुठेच दिसत नाही. दिसते फक्त नवीन बसस्थानक येथे ऑटो पॉईंट जवळ देगलूर शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणाबात भरपूर प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे देगलूर जुना बस स्टँड समोर ,लोहिया मैदान जुना सराफा भाजी मार्केट हे रस्ते व्यापारी द्रष्ट्या अतिशय महत्वाचे रस्ता आहे. पण या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन आपले दुकान रस्त्यावर थाटले आहेत. दुकानातील अर्धे सामान रस्त्यावरच ठेवण्यात येत असल्याने दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आपली मोटारसायकल रस्त्यावरच उभी करत आहेत. व्यापारी, दुकानदार आणि वाहणधारकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील पार्किंग बाबत कुठलेच नियम पाळण्यात येत नसून नियम पाळण्याबाबत कुणीही सुचना देत नाहीत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणा वाढला आहे. वाढलेला बेशिस्त पणा कमी होवून व्यापाऱ्यासह वाहणधारकांनाही शिस्त लागावी त्यासाठी देगलूर पोलीस प्रशासनाने पथक नेमून शहरामध्ये फिरुन रस्त्यावर मांडलेली दुकाने, दुकानाबाहेर लावलेले सामान, दुकानाच्या बाहेर लावलेल्या रोडवर ठेवलेल्या दुकानाच्या पाट्या याबाबत प्रत्येक दुकानदाराला तंबी देऊन तात्काळ अतिक्रमण काढायला लावावे तसेच अतिक्रमण काढल्यावर पुन्हा अतिक्रमण केल्यास भारतीय दंड संहितेच्या २८३ प्रमाणे गुन्हे दाखल करावे त्याचबरोबर रोडवर एक लाईन सोडून डबल लाईन करणे आडवी तिडवी रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने टू व्हीलर फोर व्हीलर लावने यावर अनेक गाड्यावर कारवाई करून दंड आकारला जावा तरच देगलूर शहरातील वाहतूक सुरळीत होऊन सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकडे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे असे देगलूर शहरातील नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे .
