दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे..
पुणे (इंदापूर) : इंद्रेश्वर मेडिकल रिसर्च फाउंडेशन इंदापूर व युवा प्रतिष्ठान तसेच माऊली निंबाळकर मित्र परिवार शेटफळ हवेली यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शेटफळ हवेली येथे करण्यात आले होते. या शिबिरास ग्रामस्थांनी उपस्थित राहत चांगला प्रतिसाद दिला.
सध्याच्या धावपळीच्या युगात ताणतणावाचे जीवनक्रम वाढते आहे. यामुळे अनेकजणांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या निमित्ताने गरजूंना आरोग्य विषयक नेमक्या टिप्स मिळाव्यात, आरोग्याच्या तक्रारींचे निरसण करण्यासाठी इंद्रेश्वर मेडिकल रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही संकल्पना राबविण्यात आली होती. यापुढेही इंद्रेश्वर मेडिकल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये असेच वेगवेगळ्या शिबिरांचे मोफत आयोजन केले जाणार आहे. असे इंद्रेश्वर मेडिकल रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के – पुंडे यांनी सांगितले.या वेळी आरोग्य तपासणीसाठी शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
शिबिरात नेत्र तपासणी, कान, नाक, घसा, अस्थिरोग , हृदय तपासणी, हृदयाचे ठोके, रक्तदाब या तपासण्या मोफत करून औषधोपचार देण्यात आले. व पुढील उपचारासंदर्भात मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात आला.आवाहन केल्यानुसार अनेक रूग्णांनी जुने रिपोर्टस आणि औषधे घेऊन आल्याचे दिसत होते.(S.F.S.) बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणे यांच्या वतीने मोफत संपुर्ण डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले या सर्व रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये डॉ.सचिन बाळकृष्ण शिर्के अकलूज प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, डॉ. सुहास शेळके कान, नाक, घसा तज्ञ, डॉ.सुधीर तांबिले नेत्र तज्ञ, डॉ. सचिन बिचुकले अस्थिरोग तज्ञ, त्याचबरोबर शेटफळ हवेली गावचे सुपुत्र व इंन्द्रेश्वर मेडिकल रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अनिल शिर्के- पुंडे अस्थिरोग तज्ञ या नामवंत डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.
या वेळी निवृत्ती शिंदे, पांडुरंग शिंदे,ग्रा.पं.सदस्य माऊली निंबाळकर, काशीनाथ शिंदे, मधुकर पवार, बाळासाहेब पवार, हरिभाऊ पुंडे, पंकज नवले, धनंजय साठे, मुरलीधर चव्हाण, शंकर चव्हाण, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डोंबांळे सर, हनुमंत ननवरे सर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
