दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी नांदेड लोहा मुख्य संपर्क प्रमुख
भरत पाटील पवार
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी मराठा, व मराठा कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले जात आहे.
‘ मी सारथीचा लाभार्थी ‘या उपक्रमाच्या माध्यमातून श्री साईनाथ बळीराम बुद्रुक यांनी पांगरी येथे ग्रामसभेच्या माध्यमातून मराठा ,कुणबी मराठा , मराठा कुणबी या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थी आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन केले.
संघ लोकसेवा आयोग ( UPSC )च्या परीक्षेत या सारथी संस्थेच्या माध्यमातून निशुल्क प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकस्मिक खर्च व मासिक विद्यावेतन देण्यात येते याविषयी माहिती देण्यात आली.
सारथी संस्थेद्वारे यूजीसी नेट ,एम. एच. सेट, एम. फिल ,पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्तिचा लाभ दिला जातो. तसेच सारथी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी योजनेच्या माध्यमातून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते, याबरोबरच डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना याविषयी देखील माहिती देण्यात आली.
यावेळी गावातील पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विद्यमान सरपंच कमलबाई कोपनर,उपसरपंच श्री माधवराव पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष मारोतराव बुद्रुक ,जय महाराष्ट्र शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर व शिक्षक वृंद ,जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री बटलवार सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भरत पाटील पवार उपाध्यक्ष गणेश बुद्रुक, हरिदास बुद्रुक ,विलास सूर्यवंशी नामदेव हंकारे ,साहेबराव गायकवाड अंगणवाडी ताई विमलबाई पाटील तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
