शाखा अध्यक्षपदी कल्पेशभाऊ यादव यांची निवड…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर): निमगाव केतकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व नगरसेवक पुणे मनपा वसंत(तात्या) मोरे यांच्या शुभहस्ते झाले.निमगाव केतकी शाखा प्रमुख म्हणून कल्पेशभाऊ यादव यांची नेमणूक झाली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा सचिव रामभाऊ काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष,राजेंद्र हजारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष भिसे, बारामती तालुका अध्यक्ष निलेश वाबळे, ॲड.नितीन राजगुरू,सुभाष जाधव, ओंकार शेंडे, रोहित शेंडे, मनोज हेगडे, निखिल भोंग, गणेश भोंग, जय कुदळे, विनायक भोंगळे,अनिकेत पिंगळे, आकाश जाधव, सागर भोंगळे, नितीन भोंगळे,आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाखा अध्यक्ष कल्पेशभाऊ यादव यांना व कार्यकर्त्यांना वसंत तात्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
