दैनिक चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी गजानन ठोके
जाती-जातीत लावलेत भांडणे.!
राजकारण्यांचे मात्र सुखात नांदणे!
आरक्षण साठी इथ करावे लागतात मोर्चे,अन् उपोषण!
सरकार खातंय का माती अन् शेण!
न्याय मागाया जेव्हां लोक उतरतात रस्त्यावर!
तेंव्हा सगळे राजकारणी येतात भानावर!
जेव्हां न्याय मागणी करणाऱ्याला प्रतिसाद मिळतो भरपूर!
तेंव्हा जनतेवर सोडला जातो नळकांड्या मधील अश्रुंचा धूर!
इथ वारकऱ्यावर सुद्धा केला जातो हल्ला!
जनतेच्या पैशावर खुशाल मारतात डल्ला!
सरकारचा निषेध म्हणून आम्ही सुद्धा बस पेटवल्या!
पण सरकारने आमच्याच कराच्या पैशातून नव्या बस घेतल्या!
आजच्या घडीला न्याय मागण्यासाठी सगळे लोक रस्त्यावरी!
मग शासन नेमकं जातय कोणाच्या दारी!
वा!रे शासन आपल्या दारी!
चला निघा व्हा माघारी!
कवी- ज्ञानदेव एम थोरे केकत जळगावकर…
