आंदोलन अतिशय शांततेत पार पडले …
पोलिस प्रशासनाने ही केले कौतुक.
दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी गजानन जाधव
नांदेड (पेठवडज) :- मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथेल उपोषण कर्त्यांवर लाठीमार झाला. या घटनेचा पेठवडज ता कंधार येथील मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा व गावबंद चे आयोजन करुन सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद पाळुन राज्य शासनाचा निषेध करण्यात आला व शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी जालना जिल्ह्यातील मराठ्यांवर केलेल्या लाठीमारातील संबंधित दोशी अधिकारी कर्मचारी यांना धडा शिकवल्या शिवाय शांत बसणार नाही असे आव्हान सकल मराठा समाजाच्यावतीने केले. यावेळी पांडुरंग कंधारे , हरिश्चंद्र राजे, खुशाल राजे, तिरुपती जाधव, नामदेव डावकोरे, देविदास कारभारी तसेच पेठवडज येथील सर्व मराठा बांधव उपस्थित होते.
