दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा तालुक्यातील मौजे शेवडी बा.येथील ४५ वर्षीय शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरी पत्राच्या खाली दिलेल्या दांडीला गळफास घेऊन आत्महात्या केली.
शेवडी (बा.)ता.लोहा येथील अल्पभूधारक शेतकरी संत्राम किशनराव सोनटक्के वय ४५ वर्ष यांनी सततचा नापिकीला व अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे कंटाळून शेतातील उत्पादन खर्च निघत नाही.व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या संत्राम सोनटक्के यांनी दि २ डिसेंबर रोजी पहाटे त्याची पत्नी बाहेर फिरून ( माॅर्निंग वाॅक) घरात आल्या नंतर घरामध्ये पत्र्याच्या खाली दिलेल्या दांडीला गळफास लावून संत्राम सोनटक्के दिसून आला. याची माहिती (बातमी) वाऱ्यासारखी गावत कळताच नागरिकांनी गर्दी केली. सदरील घटनेची माहिती सोनखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी पंचनामा करून अक्समिक मृत्यूची नोंद केली.संत्राम सोनटक्के यांच्या अकाली निधनाने परिसरात शांतता पसरली होती.त्यांच्या पश्चात आई, वडील , भाऊ,पत्नी ,एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे.
