निमगाव केतकी मध्ये त्यांचा सत्कार संपन्न…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसओबीसी सेल महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांनी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये संतोष राजगुरू सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक गेल्या वीस वर्षापासून चळवळीमध्ये समाजकार्यामध्ये सावता परिषदेच्या माध्यमातून काम करत आहेत.
या कार्याची दखल घेऊन संतोष राजगुरू यांनाही ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड केली. निमगाव केतकी मध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष राजगुरू म्हणाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार दत्तामामा भरणे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी ओबीसी घटकांचा काम सक्रियपणे करणार आहे. ओबीसीच्या मागण्यासाठी ओबीसीच्या मग आरक्षणाचा लढा असेल या संघर्षामध्ये मी तन-मंन लावून पक्ष वाढवण्यासाठी ओबीसीच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक ओबीसीतील घटकांच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी आपण या पदाचा वापर करणार आहे माझ्यावर राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी मला मिळालेली आहे त्या जबाबदारीचं नक्की मी सोने करेल.
ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडेंनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अधिक जोमाने ओबीसीची मोट बांधून ओबीसीच्या मागण्यासाठी संघर्ष करत राहणार आहे. संतोष राजगुरू हे गेल्या अनेक वर्षापासून सावता परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या अनेक वर्षापासून संघटना स्थापनेपासून आखाडे साहेबांच्या माध्यमातून संघटनेचे काम करत आले आहेत खूप प्रामाणिकपणे संतोष राजगुरू यांनी संघटनेचे काम केलेलं आहे त्याचीच पोचपावती म्हणून त्यांच्या आज ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली. ओबीसी सेल महाराष्ट्र राज्यामध्ये अधिक मजबूत करण्यासाठी आपण काम करणार आहे ओबीसीच्या अनेक मागणी प्रलंबित आहेत या मागण्याला वाचा फोडण्यासाठी मागण्यावरती आवाज उठवण्यासाठी ओबीसी सेल च्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी मागे असे संतोष राजगुरू म्हणाले पुढे पाहणार नाही सन 2019 ला विधानसभा झाली त्या विधानसभे च्या वेळी सावता परिषदेने महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे सावता परिषदेची संघटनेची ताकद उभा केली आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालेला आहे श्री संत शिरोमणी सावता माळी चौकामध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी एडवोकेट सचिनजी राऊत, राष्ट्रवादी इंदापूर तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, गजराज परिवाराचे अध्यक्ष संदीप भाऊ भोंग,समता परिषदेचे नेते दादासाहेब शेंडे,सावता माळी ट्रस्ट निमगाव केतकी उपाध्यक्ष मारुती भोंग, केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग, महात्मा फुले ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर ढगे, विजय पाटील, लक्ष्मण फरांदे,इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे मा संचालक जुनी हक्क पेन्शन योजनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष हेगडे, पत्रकार निलेशजी भोंग, गुरुजी कपिल हेगडे, गणेश जी शेळके ,बबलू लोणकर, अंकुश जठार, महादेव बनकर, कोंडीबा भोंग, प्रगतशील बागायतदार शंकर भोसले, केतकेश्वर यात्रा कमिटीचे सचिव मारुती नाना घनवट, महेश जठार, ननवरे सर सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…
