कार्यवाही न झाल्यास अर्धनग्न उपोषण- राहाटे…
समिर शिरवडकर-रत्नागिरी
रत्नागिरी :-वाटद मिरवणे ग्रामपंचायत मध्ये सन २०१४-१९ मध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सौचालय योजने चा मोठया प्रमाणात RTI मधून भ्रष्टाचार उगड झाला होता व चौकशी दरम्यान योजने मध्ये अनियमिता, कर्तव्यात कसूर व गैरव्यवहार झालेला आढळून आलेला आहे.तक्रारदार श्री निलेश वि रहाटे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे मुख्यप्रचार प्रमुख व पत्रकार.गावचे ग्रामस्थ हयांच्या १८ महिन्याच्या पाठपुरावा नी उपमुख्यकार्यकारी अधिकारी मा राहुल देसाई साहेब हयांनी सन २०१४ते १९ मधील संबंधित दोषी तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सदस्य हयांच्यावर नियमानुसार प्रशासकीय कारवाई तातडीने करण्यात यावी असे आदेश गटविकास अधिकारी हयांना देण्यात आले आहेत परंतु ह्यापूर्वी १८ महिन्यामध्ये देण्यात आलेले काही निर्णय हे संबंधित अधिकारी हयांनी शासन परिपत्रक क्र. व्ही.पीएम -२०१६/प्र. क्र २५३/पंरा३ दि ४ जानेवारी २०१७च्या परिपत्रकाप्रमाणे योग्य व समाधानकारक नसल्याने तक्रारदार नी फेटाले होते व तक्रारदार ला १८ महिने मानसिक त्रास ही सहन करावा लागला तरी ह्या वेळी तरी समाधानकारक व योग्य निर्णय गटविकास अधिकारी मा. जे.पी जाधव साहेब देतील हि अपेक्षा जर तसे न झाल्यास तक्रारदार व गावातील ग्रामस्थ हे २५ जानेवारी २०२४ रोजी अर्धनग्न होऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे रहाटे यांनी सांगितले.
