जेजुरी प्रतिनिधी:संदिप रोमण.
दि.१४ जून
जेजुरी मधील 1992 सालापासून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासने पोलीस बंदोबस्तामध्ये हटवल्यामुळे आज सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जेजुरी मध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे याप्रसंगी पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष पंकज धिवार जेजुरीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष भालेराव भगवान डिखळे पंढरीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जोपर्यंत प्रशासन नवीन ठिकाणी जागा देत नाही आणि बसवून देत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील अशा पद्धतीची भूमिका घेतली आंबेडकर यांचा विजय असो नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत त्यांनी संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी पुणे पंढरपूर महामार्ग बंद पडलेला आहे दोन तासाभरापासून संपूर्ण हायवे बंद असल्यामुळे दोन्ही बाजूला तीन तीन किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेले होत्या. यावेळी आंदोलकांनी पुतळ्यासाठी जेजुरी नगरपालिकेच्या हद्यीत पुणे पंढरपूर आणि पुणे बारामती रस्त्याच्या मध्यभागच्या शेजारी पुढील भविष्यामध्ये शंभर वर्षांमध्ये पुतळ्याची जागा हालवता येणार नाही अशा पद्धतीने पूर्णकृती पुतळा मेघडम्रीसह बसवून देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली . आंदोलकांचे निवेदन आणि चर्चा करण्यासाठी पुरंदर विभागाच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारूदत इंगोले विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. उपविभागीय अधिकारी यांनी नगरपालिकेचे हद्दीत त्याच गटातील जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येईल असे सांगितले.
