प्रतिनिधी :अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
पावसाळ्याची सुरवात झालेली असून कारंजा शहरासह परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्युत ग्राहकांना रात्री बे रात्री विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे,तसेच आगामी १७ जून रोजी ईद-उल-अजहा बकरी-ईद असल्याने कारंजा शहरासह परिसरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी उपविभागीय कार्यकारी अभियंता महावितरण कारंजा यांना देण्यात आले,यावेळी कारंजा नप गटनेता अड़ फ़िरोज शेकुवाले, नगरसेवक सलीम गारवे,सलीम प्यारेवाले, अ रशीद,जावेदोद्दीन, यूसुफ खान मौलाना,उस्मान खान,मो शारिक शेख,इलियास मिर्ज़ा,मो नईम बिल्डर,शहबाज खान,हामिद शेख तथा मुजाहिद खान आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
