दैनिक चालु वार्ता म्हसळा (रायगड )प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – गेली अनेक दिवस सातत्याने मा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मा खासदार सुनीलजी तटकरे साहेब मा कार्यकारी अभियंता MSRDC मा जिल्हाधिकारी साहेब मा प्रांत साहेब मा तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन तोंडसुरे बायपास श्रीवर्धन रोड ते न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा पर्यंत पावसाचे पाणी जाण्यासाठी एक ही मोरी अथवा गटार रस्ते बांधकाम करणाऱ्या एजन्सी यांनी ठेवलेला नाही त्यातच केबल खोदकाम झाल्याने रस्त्याच्या बाजूची संपूर्ण माती रस्त्यावर आली आहे सध्या नुकताच पाऊस सुरू झाला आहे तर ही परिस्थिती आहे यापुढे अजून तीन महिने पाऊस आहे तेव्हा काय परिस्थिती होईल याचा विचार न केलेलाच बरा .
या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का सध्या या रस्त्यावर दुचाकी पूर्णपणे स्लिप होत आहे चारचाकी गाडी ही स्लिप होत आहे सातत्याने याबाबत निवेदन दिली तरी सुद्धा प्रशासन संबंधित ठेकेदार यांना याबाबत कोणतीही कार्यवाही आणि कारवाई करताना दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे प्रशासन नक्की कशाची वाट पाहत आहे
