हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी तुषार नाटकर-
छ. संभाजीनगर (पैठण): केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. हा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीवर आघात आहे. हा चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांना देण्यात आले आहे.
या हत्येमागील राजकीय वरदहस्त किंवा सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यासह सहआरोपीवर कारवाई करावी. या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवावा, संबंधित आरोपींची नार्को टेस्ट करावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, ज्या पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली तसेच दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्यांना बडतर्फ करावे, देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शासनाने तत्काळ मदत करावी. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारावी आदीं मागण्या करण्यात आल्या.
यावेळी अखंड मराठा समाजाचे संतोष तांबे, अनिल राऊत, पवन शिसोदे, माऊली मुळे, साईनाथ कर्डिले, किशोर सदावर्ते, गणेश पवार, सुभाष नवथर, प्रशांत देशमुख, आशिष औटे, एकनाथ भाकरे, सोमनाथ बोबडे, जिजासाहेब रोडे, शामराव येवले, ऋषिकेश बोबडे, किरण शिंदे, शेखर देशमुख, नीरज पापुलवार, बाळासाहेब माने, महेश पवार, नवनाथ गोरे, हरीपंडित नवथर, नानासाहेब शेंबडे, अमोल सपकाळ, अरुण काळे, नारायण किरडे, रोहन भुमरे, संभाजी काटे, रवींद्र आमले, जिजा आवटे, अनिल निवारे, दत्तात्रय निवारे, संतोष काळे, महेश दसपुते, महादेव मापारी, जिजा कर्डिले, भरत शेळके, सोमनाथ बल्लाळ, विजय खाटीक, बाळासाहेब पठाडे, विशाल काळे, उद्धव लोहगळे, विजय कर्डिले, पिंटू आरगडे, रामकिसन सकुंडे, भगवान जाधव, शंकर निवारे, विठ्ठल जाधव, लक्ष्मण बोडले, अंकुश काळे, आदीं उपस्थित होते.
