काँग्रेस नेता राहुल गांधी अचानक भाजी मंडईत आले. सर्वसामान्यांप्रमाणे भाजी विक्रेत्याला भाजीच्या दराबाबत विचारू लागले. तेंव्हा भाजीसाठी आलेल्या महिलांना आश्चर्य वाटले.
राहुल गांधी यांनी भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या महिलांशीही चर्चा केली. तेंव्हा महिलांनी आपल्या भावना त्यांच्यापुढे व्यक्त केल्या. यावेळी महिलांनी महागाईमुळे सर्वसामान्य लोक चिंतेत असल्याचे सांगितले. (rahul gandhi)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेंव्हा भाज्यांचे दर जाणून घ्यायला भाजी मंडईत पोहोचले. तेंव्हा महिला वर्गाने त्यांच्यापुढे आपली चिंता व्यक्त केली. राहुल यांनी दुकानदाराला लसूण, टोमॅटो आणि भाज्यांच्या दराची चौकशी केली. दुकानदाराने सांगितले. लसूण ४०० रूपये किलो आहे. राहुल गांधी यांनी त्यांचा भाजी मंडईला भेट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट करताना लिहिलंय की, कधी काळी लसूण ४० रूपये किलो प्रमाणे मिळत होता, तो आता ४०० रूपये किलो झाला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट बिघडवले आहे. तर दुसरीकडे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपले असल्याची टीका केली.
राहुल गांधी यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो दिल्लीतील गिरी नगर समोरील हनुमान मंदिरच्या भाजी मंडईचा व्हिडिओ आहे. व्हिडिओत एक महिला म्हणत आहे की, आम्ही राहुल गांधी यांना चहा पिण्यासाठी बोलावले आहे. कारण त्यांनी इथे येवून पहावं की किती महागाई वाढली आहे. ज्यामुळे आमचे घराचे बजेट पुर्णपणे कोलमडले आहे. महिलांनी गांधी यांना सांगितले की, आपचे पगार तर वाढलेले नाहीत, मात्र सर्व वस्तूंचे दर वाढत आहेत, जे कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.
४०-५० च्या खाली काही मिळत नाही
व्हिडिओत राहुल गांधी महिलांना विचारतात की, आज काय विकत घेताय? यावर एक महिला म्हणते की, त्या थोडे टोमॅटो, कांदा खरेदी करणार आहे. ज्यामुळे घरात काही बनवता येईल. एक महिला दुकानदाराला विचारते की, आज भाजी एवढी महाग का आहे. काहीच स्वस्त नाही. काहीच ३०-३५ रूपयांमध्ये मिळत नाही. सर्व काही ४०-५० रूपयांपेक्षा अधिक महाग आहे.
भाजी विक्रेत्यानेही भाजी महागल्याचे केले मान्य
राहुल गांधी यांच्या व्हिडिओमध्ये भाजी विक्रेता म्हणतो, होय यावेळी भाज्यांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. याआधी इतकी महागाई नव्हती. तेंव्हा राहुल गांधी भाजी विक्रेत्याला विचारतात की, लसूण कसा किलो, तेंव्हा भाजीवाला सांगतो की, लसूण ४०० रूपये किलो झाला आहे.
राहुल गांधी यांनी एका महिलेला विचारले की तुम्हाला काय वाटते, महागाई का वाढते आहे. त्यावर महिला म्हणते की, सरकार महागाईबाबत लक्ष देत नाहीय. त्यांना तर फक्त भाषणबाजीच करायची आहे. सर्वसामान्य माणूस काय खाणार या गोष्टीशी सरकारचे काहीच देणेघेणे नाही. जी वस्तू पूर्वी ५०० रूपयांना मिळायची ती आता १००० रूपयांवर पोहोचली आहे. आता खर्च कमी करायचा तर आम्हाला कोणत्या तरी गोष्टीत कपात करायला हवी, त्यामुळे आम्हाला फक्त त्रासच हाईल.
