मैदानावर जे घडलं…
मेलबर्नच्या मैदानावर चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी तुफान राडा झाल्याची घटना घडली होती.टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षांचा खेळाडू सॅम कोन्सटास यांच्यात धक्काबुक्की झाली.
मैदानावरील या राड्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर या संपूर्ण राड्यावर आता सॅम कोन्सटासने प्रतिक्रिया दिली आहे. तो नेमकं या राड्यावर काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाविरूद्ध टेस्ट सामन्यात डेब्यू करणारा सॅम कोन्सटासने विराट कोहली सोबत झालेल्या धक्काबुक्कीवर वक्तव्य केले आहे. सकाळच्या सत्रात ड्रिक्स ब्रेक झाल्यावर त्याने आपलं मतं मांडलं आहे. कोन्सटास म्हणाला, मैदानावर जे काही घडतं,ते मैदानावर राहतं. मला प्रतिस्पर्धी संघाला टक्कर देत खेळण आवडतं आणि या खचाखच भरलेल्या स्टेडिअममध्ये पदार्पण करण्याशिवाय अजून काय चांगल असू शकतं.
डेब्यू सामन्यावर बोलताना सॅम कोन्सटास पुढे म्हणाला, हे खूपच अवास्तिक आहे. चाहत्यांची गर्दी पाहा. मी फक्त मोकळेपणाने खेळण्याचा प्रयत्न केला. बुमराह विरूद्ध रॅम्प शॉट खेळण्याविरूद्ध कोन्सटास म्हणाला की, जेव्हा चेंडू येतो तेव्हाच मी हात शॉट खेळतो. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यावर माझे लक्ष्य असतं,असे तो म्हणाला आहे.
नेमका वाद काय झाला?
खरं तर भारताच्या 10 व्या ओव्हर दरम्यान हा सगळा राडा खडला आहे.कदाचित सॅम कोन्सटास क्रिझ क्रॉस करत होता. त्याच्या समोरून विराट कोहली जात होता.यावेळेस विराटचा खांदा अचानक थेट सॅम कोन्सटास धडकला. त्यानंतर सॅम कोन्सटास भडकला आणि त्याने विराटच्या दिशेने पाहून काहीतरी पुटपुटायला सूरूवात केली. यावेळी विराट देखील त्याला काहीतरी बोलला. दोघांमधीली शाब्दीक वाद वाढताना पाहून उस्मान ख्वाजा आणि अंपायरने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटला. या वादाचा आता व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
MCG कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: उस्मान ख्वाजा, सॅम कोन्सटास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.
MCG कसोटीसाठी भारताचे प्लेइंग-11: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर) नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
