बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालकांना दिले आहेत.
त्याचबरोबर बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील, तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशाही सुचना बीड पोलिस अधीक्षकांना देत तातडीने फेरआढावा घेण्य़ाचा आदेश दिला आहे.
