धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर अंजली दमानिया उसळून म्हणाल्या…
बीड:बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. संतोष देशमुख या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. हे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. तर या प्रकरणात अगदी सुरवातीपासून स्पष्टपणे आपली भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आज अश्रू अनावर झाले, त्यांनी सरकारला जाब विचारत असे लोक सत्तेत कशासाठी हवे आहेत, धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे, सरकार इतकं का त्यांना महत्व देतंय असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करत दमानियांनी धनंजय मुंडेंना खुलं आव्हान दिलं आहे.
धनंजय मुंडेंना दमानियांचं आव्हान
काल ते धनंजय मुंडे म्हणत आहेत माझ्याविरुद्ध जे जे बोलले त्यांना मी धडा शिकवीन, मी त्यांना ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा आहे तो शिकवा तुम्हाला जे करायचं आहे ते करा असेल हिम्मत तर बघू आपण. लढाईची ताकद ठेवते मी असेही पुढे अंजली दमानिया यांनी म्हटल आहे
मुंडेंना बडतर्फ केलं नाही तर आम्ही अधिवेशन बंद पाडू
धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे. यांना त्याचा राजीनामा का घ्यायचा आहे. त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. सरकार इतकं का त्यांना महत्व देतंय. मुंडेंच्या माणसाने 10 वर्षं संघटित गुन्हेगारी केली, तरीही सरकार असं असंवेदनशील का वागत आहे. वाल्मिक कराडला का अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे. त्या थर्डक्लास कराडला कोठडीतही व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते? आज मी धनंजय मुंडेंविरोधात आणखीन एक पुरावा समोर आणणार होते, आत्तापर्यंत कितीतरी पुरावे दिले आहेत. पुरावे दिले की, बोलतात आरोप सिद्ध होऊ देत, नेमकं काय चाललंय? अजित पवारांनी लोकप्रतिनिधी म्हणून वागावं. आरोपपत्र दाखल होईपर्यंत मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना या फोटोबाबत, व्हिडिओबाबत माहिती नव्हतं का…? धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं नाही तर आम्ही अधिवेशन बंद पाडू असा इशारा देखील आज अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
या प्रकरणावर बोलताना अंजली दमानियांना अश्रू अनावर झाले, बोलताना त्या म्हणाल्या, मला राग येत आहे. राजीनामा अजून आहे, अजून राजीनामा आहे. इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा घ्यायचा आहे. एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? असा मंत्री नको हे आदेश का देत नाहीत, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाही. जर आज यांचा आता राजीनामा नाही आला, बडतर्फ केलं गेलं नाही.. तर संपूर्ण महाराष्ट्रात जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले त्या सगळ्यांना मी हात जोडून निवेदन करते की उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोहोचायचं आणि यांचा अधिवेशन बंद पाडायचा, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
मुंडे फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार
थोड्याच वेळात धनंजय मुंडे यांच्यावतीने थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती आहे. रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना मुंडे राजीनामा देत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुंडे राजीनामा आज देतील असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मुंडे थोड्याच वेळात आपल्या माणसाकरवी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडा भरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावर खलबंत सुरू होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा क्लीनचीट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला असल्याची माहिती आहे.
