धनंजय मुंडेंनंतर आता धसांच्या हिट लिस्टवर ‘हा’ बडा नेता…
संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना अडचणीत आणले. सुरेश धस 2009 ते 2014 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.
ते आत्ता भाजपचे आमदार आहेत. धस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांच्यावर कायम राग राहिली, असे वक्तव्य करताना त्या मागचे कारण देखील सांगिले आहे.
‘छगन भुजबळ माझ्याबद्दल बोलणारच. मीही त्यांचं नाव स्पष्टपणे घेतोय. मी त्यांना तुरुंगात मुद्दाम भेटायला गेलो होतो. 2009 ते 2014 या काळात त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नाही. 2014 च्या निवडणुकीत माझ्या पराभवासाठी भुजबळ जबाबदार आहेत,’ असा आरोप धस यांनी केला.
भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीसाठी प्रयत्न करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मी त्यांना निधी मागायला गेलो तर ते म्हणायचे ‘सही’.
मी सरळ साधामाणूस, अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी सही करण्यात आला. माझी सही पहिलीच होती. मी सही करत असताना छगन भुजबळांच्या मुलाने, पुतण्याने पाहिले, असे देखील सुरेश धस यांनी सांगितले.
भुजबळांनी मला निधी न दिल्याने 2014 माझा पराभव झाला. तेच माझ्या पराभवाला जबाबदार आहेत. त्यांनी माझं राजकीय नुकसान केलं, म्हणून मी त्यांच्यावर नाराज आहे. त्यांना भेटायला जाऊनही मी मनातली खंत बोलून दाखवली, असंही धस म्हणाले.
मी खून्नस काढणार
छगन भुजबळांचा काय सांगता? ते फार खुनशी वागतात. म्हणून मी खुन्नस काढून त्यांना भेटायला गेलो. मी भुजबळांविरोधात केव्हाही खुन्नस काढणारच. मला त्यांच्याबद्दल रागच आहे. पाडलं ना मला त्यांनी. माझी 5 वर्षे वाया घालवली. मग भुजबळांबद्दल गोड बोलायचं का?असा प्रश्न देखील धस यांनी केला.
