दै.चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
श्रीक्षेत्र येलवाडी ( ता खेड) सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत तुकाराम महाराज बिज उत्सव सोहळा रंगपंचमी सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले दि १२ रोजी प्रारंभ झाला
या अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकाडा आरती सकाळी ७ ते २पारायण दुपारी २ ते ४ संगीत भजन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ७ ते ९ किर्तन नंतर महाप्रसाद असा कार्यक्रम दि १९ रोजी पर्यंत सांगता होणार आहे
दि १२रोजी ह भ प निलमताई पोतले किर्तन दि १३रोजी ह भ प संग्राम बापू भंडारे किर्तन दि १४रोजी ह भ प संतोष महाराज काळोखे दि १५ रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली काकडे किर्तन दि १६रोजी ह भ प चांगदेव महाराज परतुरकर यांचे कीर्तन दि १७ रोजी ह भ प कविराज महाराज झावरे १८रोजी ह भ प कबीर महाराज अत्तार किर्तन होणार असुन दि १९रोजी गाथा पारायण रंगपंचमी सोहळा सांगाता काल्याचे किर्तन ह भ प देहूकर महाराज यांचे किर्तन सकाळी १० ते १२ होईल त्यानंतर महाप्रसाद समस्त येलवाडी ग्रामस्थ यांच्या तर्फे आयोजित केला आहे
या अखंड हरिनाम सप्ताह रंगपंचमी सोहळा सप्ताहात सर्व ग्रामस्थांनी मदत दिली आहे या कार्यक्रमात नियोजन खेड तालुका कृषी उत्पन्न समिती बाजार मा अध्यक्ष तथा येलवाडी ग्रामपंचायत सरपंच रंजित विठ्ठल गाडे यांनी केले असून या सप्ताहात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे
