दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
(यावेळी श्रीम.मजुंषा लटपटे उपविभागीय अधिकारी कार्यालय,अहमदपुर जि.लातूर यांना दिले निषेधार्थ निवेदन)
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील तहसीलदार कार्यालय अहमदपुर येथे सकल मातंग समाजाच्या विविध ठिकाणी अत्याचार व मारहाण केल्याप्रकरणी प्रतिबंधक मागणी संदर्भात उपस्थित समाजबांधव याच्या वतीने निषेध करत दिले निवेदन ,
म्हणून राज्यातील मातंग समाजातील तानाजी सोनकांबळे रा.उदगीर यांची निघृण हत्या प्रकरणी व परभणी येथील मातंग समाजाच्या 10 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी बलात्काराविषयी सकल मातंग समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे
अनुसुचित जातीतील मातंग समाजाच्या तानाजी सोनकांबळे रा. उदगीर या तरूणाची निघृण हत्या करण्यता आली आहे. व परभणी येथे मातंग समाजाच्या 10 वर्षीय मुलीवर तिघा नराधमांनी पाशवी बलात्कार केला असून, या दोन्ही गुन्ह्यातील गुन्हेगारांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व व्यक्तींवर प्रकरण फास्ट्रैक कोर्टात चालवून सदरील व्यक्तींवर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी व समाजात पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे घडू नये या संबंधी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा दि.20 मार्च 2025 रोजी सकाळी ठिक 11 वाजता साहित्यरत्न डॉ. अन्नाभाऊ साठे चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी. अश्याचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे.
यावेळी डॉ.गंगाधर साखरे,डॉ बालाजी वाघमारे हाळनीकर,डी एस वाघमारे,गणेश वाघमारे,रामनाथ पलमटे, सतीश नामपल्ले, शिवजी जंगापल्ले,मनोहर सूर्यवंशी,मनोहर कौडेकर,शिवजी कांबळे, युवराज मोरे,रमाकांत अरनुरे,संभाजी अकरूपे,उत्तम वाघमारे,रोहन माने, आदिंची उपस्थिती होती.
