दैनिक चालु वार्ता बिड माजलगांव प्रतिनिधि -नाजेर कुरेशी
दिनांक 14/03/2025 रोजी धुलीवंदन सणानिमित्त पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे माजलगांव शहर पोलीसांनी माजलगांव बायपास रोड माजलगाव येथे असलेल्या अक्षरा नावाचे हॉटेलवर छापा मारून तेथून 970/-रुपयाची देशी व विदेशी दारू तसेच माजलगाव ते गढी जाणारे रोडलागत असलेल्या शिवशाही नावाचे हॉटेलवर छापा मारून तेथून 7670/- रुपयाची देशी व विदेशी दारू अशी 8640/- रुपयाची देशी विदेशी दारु जप्त करुन अक्षरा हॉटेल मालक प्रदीप मधुकर साळवे शिवशाही हॉटेल मालक गोपीनाथ अच्युतराव शिंदे यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, नीरज राजगुरु पोलीस उपअधीक्षक उपविभाग गेवराई, अति. पदभार माजलगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोहेकॉ संदिप मोरे, पोलीस अंमलदार अमोल कदम, शिवगणेश मिरकले यांनी केली आहे.
