दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (टेंभुर्णी):-२८ डिसेंबर २०२४रोजी श्री. नरसिंह गणेश मंदिरातून अज्ञात इसमाने दानपेटी चोरून नेली होती.मंदिरात CCTV बसवण्यात आले असल्याने आरोपीचे पूटेज उपलब्ध होते चोरीची बातमी वृत्तपत्रातून तसेच सोशल मीडियातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली होती.
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दीपक पाटील हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून होते दिनांक १४/३/२०२५ रोजी गुन्हे अन्वेषण पथक टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार विनोद साठे यांना यातील आरोपी हा अकलूज येते असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के पोलीस हवालदार विनोद साठे, संदीप गिरमकर यांनी आरोपी युवराज उर्फ सोन्या खंडागळे रा. अकलूज यास अकलूज येथून ताब्यात घेतले व मंदिरातील दानपेटी बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दानपेटीतील पैसे चोरी केल्याचे कबूल केले.
चोरी, दरोडा, मारामारी, दंगल, खून यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडणे हे देखील पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे.. वाढती गुन्हेगारी,वाढती लोकसंख्या वाढते शहरीकरण व पोलिसांची अपुरी संख्या यामुळे आधीच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा खूप ताण आहे.
चांगल्या कामाचे कौतुक झाले पाहिजे या उद्देशाने आज नरसिंह प्रतिष्ठान च्या वतीने सदर मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा उघड केल्याबद्दल पोलीस अधिकारी दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस अंमलदार विनोद साठे,संदीप गिरमकर यांचा नरसिंह प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी ब्रह्मदेव गायकवाड, श्रीकांत पवार,गणेश गायकवाड, शरद पवार, डॉ. विनायक गंभीरे, गणेश पलंगे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बोबडे, सचिन होदाडे, सोमनाथ तांबे, जयंत कांबळे, नटराज पलंगे, अजय कांबळे, गणेश इंगोले व नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज वंजाळे सर यांनी केले.
