दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे पीर साहेब उरूस यात्रेची तयारी उत्साहात सुरू झाली आहे.
निमसाखर गावचे पीर साहेब देवस्थानचे मानकरी व तंटामुक्ती अध्यक्ष तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष जयकुमार रणवरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रुढी व परंपरेनुसार चालत आलेली पीर साहेब उरूस यात्रा शनिवार दिनांक २२/३/२०२५ पासून सुरू होत असून निमसाखर व निमसाखर पंचक्रोशीतील हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. शनिवार २२/३/२०२५ रोजी संदल वाजत गाजत मिरवणूक, ( गलप चढवणे ), व रविवार दिनांक २३/३/२०२५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सायंकाळी ९ वाजता आनंद महाजन जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच सोमवार दिनांक २४/३/२०२५ रोजी महिला दर्शनासाठी येतात.
अशी माहिती निमसाखर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व यात्रेचे मुख्य मानकरी व श्री. संतोष जयकुमार रणवरे पाटील यांनी दिली.
या यात्रेसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत, एम एस ई बी., आरोग्य विभाग, पोलीस खाते यांचे विशेष सहकार्य होते.
तसेच पीर साहेब उरूस यात्रा पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष जयकुमार रणवरे पाटील, निमसाखर गावचे विद्यमान सरपंच धैर्यशील विजयकुमार रणवरे पाटील. सदस्य सुनील( नाना) रणवरे,गजानन रणवरे,राजेंद्र रणवरे, धनंजय रणवरे,धीरज रणवरे पाटील, अजित ( दादा ) रणवरे,सिद्धार्थ रणसिंग,अजिंक्य आनंदराव रणवरे पाटील,नंदकुमार चव्हाण,निखिल अडसूळ, खुदा भाई मुलानी, लतीफ भाई मुलानी,रशीद(बाळू भाई )मुलानी, यांचे विशेष योगदान असते.


