दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर)
दि. 17 मार्च सोमवार रोजी सायंकाळी
बेकायदेशीरपणे व विनापरवाना वाळूची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर मरखेल पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून 14 लाख 24 हजार रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत .
काही वाळू माफिये ट्रॅक्टर मधून वाळूची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती मार्केट पोलिसांना मिळाली .त्या अनुषंगाने मरखेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी वझर ते शिळवणी रस्त्यावर सापळा रचला असता महात्मा बसेश्वर पुतळ्या समोरून वसंत तुकाराम कसले रा. रामनगर ता. औराद याने ट्रॅक्टर मधून वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर व ट्रैली याचे अंदाजे किंमत 3 लाख 50 हजार रुपये तसेच यामध्ये 1 ब्रास रेती किंमत 6 हजार असे एकूण 3 लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तसेच विना नंबर ट्रॅक्टर मधूनच चोरीच्या उद्देशाने वाळूची वाहतूक करत असताना चंद्रकांत शंकर पवार रा. कमळ नगर ता. औराद हा मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
उपरोक्त घटनेची पुनरावृत्ती करीत असताना सिमल उमाकांत सूर्यवंशी (26) रा. मुंगनाळ ता. औराद व इस्माईल कुरेशी रा. औराद या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आले. तसेच सुभाष शंकर कासले (45) रा. रामनगर ता. औराद व सुभाष लक्ष्मण कसले या दोघांनी ही ट्रॅक्टर मधून वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. असे अवैध वाळूची वाहतूक करीत असताना चार ट्रॅक्टर व आतील चार ब्रास वाळू ज्याचे अंदाजे किंमत 14 लाख 24 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
सदरील कारवाई सोमवार दि. 17 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. एकाच दिवशी अशी धाडसी कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.
