दैनिक चालु वार्ता लोहा / प्रतिनिधी-
लोहा तालुक्यातील पांगरी येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह ,शिवमहापुराण कथा तुकाराम महाराज बीज व नाथषष्ठी उत्सव विविध भरगच्च कार्यक्रमांनी चालू असुन उद्या दि.२२-३-२०२५ रोजी सदरील कार्यक्रमांची सांगता मराठवाडा भूषण श्री हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार असुन सदरील काल्याचे किर्तन उद्या सकाळी ९ ते ११ या वेळात होणार आहे.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून तेव्हा या कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पांगरी यांनी केले आहे.
