दैनिक चालु वार्ता माजलगाव प्रतिनिधी- नाजेर कुरेशी
गोरगरीब जनतेला निवारा मीळावा कोणीही बेघर राहू नये म्हणून केंद्राच्या पंतप्रधान कार्यालयाकडून पीएम आवास योजना राबवण्यात आली खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेने आपल्याला घर मिळावा म्हणून सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे याचना केली मात्र याचा गैरफायदा घेत माजलगाव तालुक्यातील सरपंच साहेब ग्रामसेवक घरकुल पाहिजे असेल तर पाच किंवा दहा हजार रुपयांचे मागणी करत आहेत मोल मजुरी करणारे लोक यांच्याकडे एवढे पैसे असते तर तुमचे घरकुल मागायला तरी आले असते का?
जीवणे साहेब तुम्ही प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागता किंवा जीमेदारी झटकून मोकळे हॊतात मात्र कोट्यावधी रुपये खर्चून निर्माण केलेलं जिल्हा परिषद प्रशासन काय कामाचं? ही फक्त आम्ही माजलगाव तालुक्याची व्यथा मांडत आहोत जिल्हाभरात हीच परिस्थिती चालू आहे याबाबत कोणीही आवाज उठवत नाही जिल्हाभरातील सरपंच आणि ग्रामसेवक तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर आम्ही मागतो ती रक्कम तुम्हाला द्यावीच लागेल असे सांगतात आणि मंजूर घरकुलचे हफ्ते मिळविण्या साठी तुमचे इंजिनियर प्रत्येक हप्ता 2000रु मागतात अशे 50,000हजाराच्या पुढे जातात आणि हे सर्व लोक म्हणतात हे पैसे आमच्या एकट्यासाठी नसतात तर वरपर्यंत आम्हाला पैसे द्यावे लागतात असे असे सांगतात हे किती खरं आणि किती खोटं हे सर्वसामान्य जनतेला माहीत नाही मात्र याबाबत जिल्हाभरात प्रत्येक पंचायत समितीला जीवणे साहेबांनी जर कडक सूचना दिल्या बीडिओ यांचे कान पिळले तर जनतेची होणारी लूट निश्चितच थांबेल आणि हे झाले नाही तर भ्रष्ट प्रशासनाची इथून तिथून साखळी असते हा संदेश जनतेत जाईल आणि याचे अत्यंत वाईट परिणाम जिल्हा परिषद प्रशासनाला भोगावे लागतील हे मात्र निश्चित त्यामुळे जीवने साहेब जातीने लक्ष घाला आम्ही तुम्हाला तरुण तडफदार आणि इमानदार अधिकारी समजत आहोत आमचा हा गैरसमज ठरू नये एवढीच अपेक्षा.
