दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी)
गेल्या २० वर्षांपासून शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या अंशतः अनुदानावरील शिक्षकांना शासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे दि.२५ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तालुक्यातील २९ शिक्षकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोडून दिले.
गेल्या कांही वर्षापासून शासनाच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असले जवळपास बंद आहे. मध्यंतरीच्या काळात कायम विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांपुढील ‘कायम’ हा शब्द काढून टाकल्यामुळे राज्यातील हजारो उच्चशिक्षित,बेरोजगार युवकांना शिक्षकी सेवेत येण्याची संधी मिळाली;परंतु सेवेत आल्यानंतरही जवळपास २० वर्षापासून ह्या शिक्षकांना आजपर्यंत त्यांना लागू असलेल्या वेतनश्रेणी प्रमाणे पूर्ण वेतन मिळाले नाही. यातील बहुसंख्य शिक्षक हे अंशतः अनुदानावर सेवा करीत आहेत. अनुदानाच्या वाढलेल्या टप्प्यानुसार वेतन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी म्हणून राज्य शिक्षक समन्वय संघाने सातत्याने आंदोलने केली.या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी १० ऑगस्ट २०२४ रोजीच्या बैठकीत चर्चा करून दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्णय काढला. या निर्णयानुसार राज्यातील ५२ हजार शिक्षकांना त्यांच्या हेड निहाय अनिवार्य खर्च म्हणून नागपूर येथील डिसेंबर २०२४ अर्थसंकल्पात तरतूद होण्याची अपेक्षा होती;परंतु शिक्षण खात्याला पूर्णवेळ मंत्री उपलब्ध न झाल्याने या विषयाची पूरवणी मागणी मागणी मंजूर झाली नाही.यावेळेस नाहीतर निदान २०२५-२६ च्या पुरवणी मागण्या किंवा अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात येईल. या आशेने सरकारवर विश्वास ठेवून शिक्षक समन्वय संघाने कोणतेही आंदोलन केले नाही किंवा मोर्चे काढले नाहीत;परंतु २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात टप्पा वाढीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे अनुदान टप्यावर काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी दि.२४ मार्च रोजी अंशतः अनुदानावर सेवा करणाऱ्या देगलूर तालुक्यातील ९ शाळांतील एकूण ४४ शिक्षकांनी दि.२५ मार्च रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला. उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर समोर दि.२५ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिक्षक समन्वय संघांच्या ईशाऱ्यानुसार सामूहिक आत्मदहन करण्यासाठी शिक्षक एकत्र जमत असताना देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, पोलीस अंमलदार विष्णू चामलवाड, सुधाकर मरदोडे, वैजनाथ मोटरगे, साहेबराव सगरोळीकर, विशाल आटकोरे, मधुकर नामपल्ले, बळीराम गुळवे, महिला कर्मचारी ममता गुळवे, रिहाना शेख यांनी योग्य वेळी २९ शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या न्याय मागण्या कायदेशीर पद्धतीने संबंधित विभागासमोर मांडाव्यात असे समजावून आणि सूचना देऊन सोडण्यात आले. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही.
