हत्येच्या 55 तासआधी वाल्मिक कराडने सुदर्शनला फोनवर काय सांगितलं होतं ?
बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला.
यावेळी उज्जवल निकम यांनी संतोष देशमुख प्रकरणात नेमकं काय काय झालं? याचा खुलासा केला आहे. उज्जवल निकम यांनी कोर्टात तब्बल 32 मिनिटं युक्तीवाद केला. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शनला फोनवर काय सांगितलं? यावर देखील भाष्य केलं आहे.
उज्जवल निकम काय काय म्हणाले?
6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे साडेबारा वाजता आवाजा कंपनीच्या मस्साजोग येथील ऑफिसमध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा, असं सुदर्शन घुले याने धमकावलं. हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख आणि गावातील काही लोक आले आणि यावेळी सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना धमकी दिली. दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले. पण या सर्व आरोपीला प्रत्येक्ष अटक 7 डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली नाही असे निकम यांनी न्यायालयाला सांगितलं.
तिरंगा हॉटेलवर भेट अन् प्लॅन रचला
सुदर्शन घुले याने 7 डिसेंबर 2024 रात्री आठ वाजता वाल्मीक कराड याला फोन केला आणि घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराड याने अडथळा आणतील त्यांना संपवा असं सांगितलं होतं, अशी कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. त्याचे सीबीआर आणि इतर पुरावे सादर केले आहेत, असं उज्जल निकम यांनी युक्तीवादात सांगितलं. 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोड वर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले व त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता.
अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या
दरम्यान, विष्णू चाटे यांनी वाल्मीक कराड यांचा मेसेज सुदर्शन घुलेला दिला. या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत, असं उज्जवल निकम यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर 9 डिसेंबर 2024 दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केस बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत, अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार आहे, असा तब्बल 32 मिनिट युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला.
