दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
तळेगाव दाभाडे .. शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या शहरात बाजार भरतो परंतु दि. ०६ रोजीचा आठवडे बाजार स्थलांतरीत करणेबाबत. आठवडी बाजार नेहमी प्रमाणे भरतो परंतु दि ३० रोजी गुढीपाडवा असल्याने गर्दी मुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
रविवार दि. ३० रोजी गुडीपाडव्याच्या दिवशी दर सालाप्रमाणे तळेगाव दाभाडे गावचा उत्सव असले कारणाने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असणार आहे. व रविवार दि. ३०रोजी आठवडे बाजार भरविल्याने वाहतूकीची कोंडी होण्याची शक्यता नाकरता येत नसल्याने सामान्य नागरिकांची व व्यापारी, विक्रेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवार दि. ३०/०३/२०२५ रोजीचा तळेगाव दाभाडे शहराचा आठवडे बाजार रद्द करणेत येत आहे. तसेच दि. ०६/०४/२०२५ रोजीच्या आठवडे बाजाराच्या दिवशी रामनवमी असले कारणाने दि. ०६/०४/२०२५ रोजीच्या आठवडे बाजार हा मुख्य बाजरपेठेत न भरता बॉम्बे वर्कशॉप पासून मोहर प्रतिमा सोसायटीच्या रोडच्या दोन्ही बाजूस व थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे (पाटील) विद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावरती भरविण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिक, व्यवसायिक, विक्रेते, व्यापारी यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत आवाहन करण्यात येत आहे
