PCB चे गुणही लवकरच कळणार; निकाल कसा पाहायचा ?
येत्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच 2025-26 साठी घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेतली होती. त्यापैकी ‘एमएचटी सीईटी’ ही महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच विद्यार्थ्यांना कळणार आहे. १६ जून रोजी पीसीएम गटाचा निकाल लागला आहे. त्यानंतर १७ जून रोजी PCB गटाचा निकाल जाहीर होईल.
एमएचटी सीईटी’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याची संधी मिळाली होती. पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी 18 मे पर्यंत आक्षेप नोंदवता आले. पीसीएम गटासाठी 21 मे पर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत होती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता ही परीक्षा घेतली. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी ही सामाईक परीक्षा होती.
एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल कधी आणि कुठे पाहता येईल?
सुरुवातीला https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर जा.
तिथे तुम्हाला MHT-CET 2025 Results असं दिसेल.
त्यानंतर तिथे तुम्हाला ‘PCM Group’ आणि ‘PCB Group’ असं दिसेल.
ज्या विषयाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगील करा.
तिथे तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
स्कोअरकार्डची प्रिंटही काढता येईल.
येत्या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पीसीएम गटाचा निकाल १६ जूनला जाहीर झाला, तर पीसीबी गटाचा निकाल १७ जूनला वेबसाईटवर जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याची संधी मिळाली होती. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
